सातारा, दि. 10: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक यांचे मार्फत ५ व ६ मे रोजी गोविंदराव वंजारी अयुर्वेदिक महाविद्यालय, नागपुर येथे स्पदंन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न मजुंषा स्पर्धेत एकुण ३५ संघानी भाग घेतला होता. त्यापैकी ८ संघ अतिंम फेरीकरीता पात्र झाले. अंतिम फेरीत अभिजित लोंढे, शुभम रणदिवे अणि गीते या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम सादरीकरण करीत रौप्य पदक पटकावले. अविष्कार पोवार यांनी प्रभावी वक्तृत्व सादर करुन द्वितीय क्रमांक मिळवला.या यशस्वी संघाचे संघव्यवस्थापक म्हणुन डॉ.महादेव सावंत यांनी काम पाहिले.
या स्पर्धांसाठी अधिष्ठाता डॉ.विनायक काळे,उपअधिष्ठाता डॉ.भारती दासवाणी यांचे मार्गदर्शन लाभले.