फलटण दि.०८| सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यात निरगुडी मांडव-खडक या ठिकाणी अनुसूचित जाती खुला प्रवर्ग यासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. या आरक्षण सोडतीमध्ये २५ वर्षांनंतर निरगुडी ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेक हौशे नौशे गौशै स्वतःला सरपंच म्हणवून घेऊ लागले आहेत.ज्याला संरपचंची कार्य कर्तव्य काय असतात हेही माहीत नाही असे सुध्दा स्वतःला भावी सरपंच म्हणून घेउ लागले आहेत असेना का? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे आणि निवडणूक लढविली देखील पाहिजे पण निवडणूक लढविण्यासाठी सामाजिक कार्य,देखील महत्वाचे असते.२०११ च्या जनगणनेनेनुसार निरगुडी गावची लोकसंख्या ३४९० असुन ५४६ इतकी अनुसुचित जातीची लोकसंख्या आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर होताच अनेक हौशे नौशे गौशै उमेदवारांची संपर्क तसेच मोर्चे बांधणी सुरुवात होऊ लागली आहे. परतुं गावाने गावातील नागरिकांनी अशा उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे जे सुशिक्षित, व गावच्या विकासाला चालना देणारे न कि राजकारण करून विकासाला अडथळा निर्माण करणारे असावेत तसेच गावातील कोणत्याही विकास कामात किती कमिशन मिळते हे पहाणारे नसावेत. त्याचबरोबर फक्त नावासाठी सरपंच न राहता गावच्या विकासाचा पंच म्हणून राहाणारे असावेत.
ग्रामपंचायत लढविण्यारानी दोन दिवसांची निवडणूक पण ५ वर्ष सर्व नागरिकांना भोगावे लागते.त्यामुळे हौशा नवश्या गवश्या नी पैसे कमविणे किंवा नावासाठी सरपंच पदाची निवडणूक लढविणार असाल तर वाईट आहे पण खरोखरच ज्यांच्याकडे, वेळ, कुवत, ज्ञान, शिक्षण आहे.ज्यांनचा हेतू गावांसाठी काही तरी चांगले करण्याची ताकद आहे अश्या नी या क्षेत्रात यावं नाहीतर हौशे नौशे गौशै आले तर गावचा विकास नाही पण गावचा भकास नक्कीच होईल !