दि.१८ फलटण (विडणी) भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पुर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालिकेची सुरुवात मुंजवडी येथून झाली व सांगता समारंभ समतानगर( विडणी) ता. फलटण जि.सातारा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात महाकरुणी तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून त्रिसरण, पंचशील, बुद्ध पुजा आणि भिमस्मरण भिम स्तुती घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड सर यांनी केले व संघटक आयु.विजयकुमार जगताप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अश्विन पौर्णिमा या विषयावर या पौर्णिमेचे महत्त्व आणि फलटण तालुक्याच्या चार ही दिशांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यशस्वी ठरली असे सांगत सुंदर पद्धतीने आपले मनोगत आणि अश्विनी पौर्णिमा या विषयावर प्रबोधनकार, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे महासचिव आयु.बाबासाहेब जगताप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व विभागाच्या वतीने महासचिव आयु.अरुण गायकवाड सर यांनी फलटण तालुक्याचे काम अतिशय सुंदर आहे अशा शुभेच्छा देऊन फलटण तालुक्याचे कौतुक केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव सर यांनी अध्यक्षिय भाषणात पंचशील मित्र मंडळ समतानगर या मंडळाचे कौतुक वअभिनंदन केले. कार्यक्रमानंतर प्रत्येक रविवारी चला बुद्ध विहारी हा संकल्प चालू ठेवावा असे सांगण्यात आले आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे पदाधिकारी यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लाख मोलाचं योगदान दिल्याबद्दल त्याचेही अभिनंदन करुन अश्विनी पौर्णिमेच्या उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने समतानगर (विडणी ) पंचशील मित्र मंडळ यांना तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. वर्षावास प्रवचन मालिकेच्या सांगता समारंभाला सातारा जिल्हा पदाधिकारी, फलटण तालुका संपूर्ण पदाधिकारी तसेच मौजे समतानगर येथील सर्व श्रद्धावान, शीलवान, उपासक,व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार फलटण तालुक्याचे प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे सर यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका संस्कार सचिव बजरंग गायकवाड सर फलटण तालुका कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, दादासाहेब भोसले सर, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर सचिव चंद्रकांत मोहिते सर, हे हिशोब तपासणीस सतीश कांबळे सर, संरक्षण सचिव अमोल भोसले सर, विलास जगताप सर, संघटक श्रीनिवास धांईजे सर, संघटक अमोल काकडे सर, संघटक आनंदा जगताप सर, होते तसेच पंचशील मित्र मंडळ समतानगर विडणी यांचे योगदान लाभले.