दि.१६ आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांचे वाचन कमी झाले आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईलवर सर्व माहिती उपलब्ध असूनही प्रत्यक्ष पुस्तके वाचण्यात एक वेगळा आनंद आहे. डॉ. ए .पी. जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्याचाच एक भाग म्हणून शासन आदेशानुसार त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी वाचन संस्कृती जपावी व आपले विचार उच्च करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.तुषार शितोळे शंकरराव भेलके महाविद्यालय येथे आयोजित वाचन प्रेरणा दिन निमित्ताने त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
वाचनातून विचार करण्याची क्षमता वाढते, वाचनातून आपले जीवन समृद्ध करता येते, समाजामध्ये परिवर्तन घडून एक चांगला माणूस तयार होतो असे मत ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी व्यक्त केले.
डॉ. जगदिश शेवते यांनी डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास उपस्थितांसमोर अगदी सोप्या भाषेमध्ये उलगडून सांगितला.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जगदीश शेवते यांनी केले तर आभार वरिष्ठ लिपिक विकास ताकवले यांनी मानले.