शुक्रवार, दिनांक ११/१०/२०२४ रोजी नवरात्रातील खंडे नवमी या दिवसाचे औचित्य साधून प्रशालेत नवरात्रीचा जागर म्हणून भोंडला पूजन,दांडिया व कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध भोंडला गाणी फेर धरून सादर केली. तसेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी सामूहिक दांडिया नृत्य सादर केले. त्याचबरोबर माता पालक यांना कन्या पूजनासाठी निमंत्रित केले होते. महिला पालकांनी यथोचित कन्या पूजन केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी कन्यादान म्हणून महिला पालकांनी देशाच्या हरितक्रांतीला हातभार लावत विद्यार्थिनींना विविध प्रकारची रोपे भेट स्वरूपात दिली.या उपक्रमास बहुसंख्य माता पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमानंतर शाळेच्या वतीने महिलांना प्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना एकळ व सौ. भोसले प्रियंका यांनी आभार मानले.
यावेळी श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेचा मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रशालेच्या पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.