स्वप्नील खराडे पोलीस शिपाई यांच्या माध्यमातून गहाळ झालेले ५७ मोबाईल फोन शोध घेऊन मालकांना दिले परत
फलटण मधील गहाळ झालेले मोबाईल शोधून दिल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचा सन्मान करण्यात आला सविस्तर माहिती अशी की
माहे ऑगस्ट, २०२४ मधे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्नील खराडे यांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोन पैकी ५७ मोबाईल फोन शोधून मालकांना परत दिले. सदर कामगिरी सातारा जिल्ह्यात सर्वात सर्वोत्कृष्ठ असल्याने याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रशस्तीपत्र स्वीकारताना पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना सातारा शहर पोलीस ठाण्यास मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.