Homeताज्या बातम्यापालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

निघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

पुणे, दि. १६ : अनेक अधिकाऱ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातली पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. आपण स्वतःदेखील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खेड तालुक्यातील निघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, सरपंच सुनीता येळवंडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनी बालकांना बोट धरून नेले शाळेत..!

या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेणार्या बालकांना विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी बोट धरून शाळेत नेले. असा अनोखा अनुभव मिळाल्याने त्याचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेचा हा आनंददायी प्रवेश बालकांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण ठरला.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यावेळी म्हणाले, शाळा, ग्रामस्थ आणि पालक यांची एकत्रित भूमिका शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. या कामात निघोजे येथील ग्रामस्थांचा भरीव सहभाग आहे. येथे भविष्यात व्यावसायिक शिक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. पाटील म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, खाऊ, फुगे व फुले देऊन आनंददायी वातावरणात नव्या वर्षाची सुरुवात करण्यात आली. नववी-दहावीच्या वर्गांचे उद्घाटन आणि कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत किचनशेडचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

नववीच्या वर्गांची सुरुवात निघोजे शाळेची एकूण पटसंख्या ८३६ असून, यापुढे मुलींना नववी व दहावीच्या शिक्षणासाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही. हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील निघोजे, गलांडवाडी व धानोरे या तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये नववी-दहावीच्या वर्गांना मान्यता दिली आहे. ही बाब महाराष्ट्रात प्रथमच घडली असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यमिक शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे सेल: सॅमसंग, अ‍ॅमेझफिट, वनप्लस, आवाज आणि अधिक स्मार्टवॉचवर शीर्ष 10...

0
Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 आता दुसर्‍या दिवशी पोहोचला आहे. सिएटल-आधारित ई-कॉमर्स जायंटने प्रथमच तीन दिवसांची विक्री कार्यक्रम बनविण्यासाठी प्राइम डे वाढविला आहे....

माऊली समुह व फलटण येथील समर्थ प्रतीष्ठान यांच्या वतीने १,००० हजार वडापावचे वाटप

0
फलटण दि.१३| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवार दि १३ जुलै रोजी शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे मुक्कामास विसावणार असून या निमित्ताने...

Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025: रु. भारतात 10,000

0
प्राइम सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 सुरू झाले आहे. १२ जुलै रोजी मध्यरात्री राहिलेल्या या विक्रीत लोकांना १ July जुलैपर्यंत...

error: Content is protected !!