दि.८ फलटण निरगुडी येथील बौद्धवस्तीमध्ये, बुद्धविहार येथील लाईटच्या खांबावरील लाईट गेली दोन महिन्यांपासून बंद असून येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच येथील नागरीक त्रस्त आहेत. सध्या पावसाळा त्रुतु व असल्याने परिसरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात गवत, झुडुपे मोठ्या प्रमाणात उगवली आहेत. त्यामध्ये विंचू, साप इत्यादि विषारी सरपटणारे जीव मोठ्या प्रमाणात वावरत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून बौद्धवस्तीमध्ये लाईट नसल्यामुळे सगळीकडे अंधाराचे साम्राज्य आहे. अंधारामध्ये काहीच दिसत नसल्याने सदरहू सरपटणाऱ्या जीवांवर पाय पडून त्यांचा विषारी दंश होऊन जिवित हानी होऊ शकते. ग्रामिणभाग असल्याने पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत असतात याची ग्रामपंचायत प्रशासनास जाणीव असूनही ते या गंभीर विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष्य करीत आहेत.
निरगुडी ग्रामपंचायती मध्ये येथील लोकांनी वारंवार तोंडी तक्रारी केल्या तसेच ग्रामसेवक यांनीही सांगण्यात आले. तथापि ग्रामपंचायत निरगुडी सदर प्रकरणी अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. बौद्ध वस्ती मध्ये विद्युत दिव्यांच्या दुरूस्तीस इतके महिने लागावेत ? यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बौद्ध वस्तीमध्ये जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून मुलभुत सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करीत असल्याची शंका असे येथील नागरिकांना मध्ये बोलले जात आहे.