सातारा, दि. 10 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानार्तंगत सन २०२५-२६ या वर्षात क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत फळे,फुले,मसाला,लागवड,व आंबा,चिकु व मोसंबी,पेरु,आवळा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व आळिंबी उत्पादन प्रकल्प या घटकांकरीता अनुदान देण्यात येते.या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मध्ये खालील प्रमाणे घटकांना अनुदान उपलब्ध आहे.फुले लागवढ- गुलाब,ॲस्टर,बर्ड ऑफ पॅराडाईज,हेलिकोनिसास,गोल्डन रॉड,शेवंती,इत्यादी, कंदवर्गीय फुले-निशिगंध,ग्लॅडीओलस,लिलिज,लिलियम,कॅलिलिली,डेलिया, सुदी फुले- झेंडु,ॲस्टर,गॅलार्डिया,हेलिक्रायसम,शेवंती,मोगरा,जाई,जुई,झिनिया,बिजली इ. मसाला पिक लागवढ –बिया वर्गीय कंद वर्गिय मसााला पिके- मिरची, हळद व आले.बहुवर्गीय मसाला पिके – काळी मिरी,कोकम इ. विदेशी फळपिक लागवढ – ड्रॅगनफ्रुट,स्ट्रॅाबेरी,अर्वेकॅडो, जुन्या फळबागांचे पुररुज्जीवन – अळिंबी उत्पादन प्रकल्प व बीज उत्पादन केंद्र.बटन आळिंबी उत्पादनासाठी कंपोस्ट प्रकल्प, खर्चाचे अळिंबी उत्पादन केंद्र इत्यादी.
तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की,विदेशी फळे,फुले,मसाला लागवड तसेच आंबा,चिकु,संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल mahadbtmahait.in वर फलत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.