Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर, विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन मोठे व्हावे देशाचा व राज्याचा नावलौकीक वाढवा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. 16: शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य , संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 205-26 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रांतर्गत उभारण्यातत आलेल्या शाळेचेही उद्घाटन श्री. शिंदे यांनी केले. या प्रसंगी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च पदावर काम करित आहेत. माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जी. अब्दुल कलाम, राष्ट्रती द्रौपदी मुर्मू, भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानींही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे.

शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षणकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवानही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद

कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले.मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा असे आवाहन केले करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे त्यांनी सांगितले.

माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे, परंतु शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कारही घडवावे, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत आज उच्च पदावर काम करीत आहेत. शिक्षकांनी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांर्गत शाळांना भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिक्षकांनी शिक्षणाची पायाभरणी भक्कम करावी म्हणजे शैक्षणिक इमारत भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद विविध शाळंमध्ये विविध उपक्रम राबविण्यात राज्यात अग्रेसर आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असून यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. नागराजन यांनी सांगितले.या कार्यक्रमास शिक्षक, पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे सेल: सॅमसंग, अ‍ॅमेझफिट, वनप्लस, आवाज आणि अधिक स्मार्टवॉचवर शीर्ष 10...

0
Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 आता दुसर्‍या दिवशी पोहोचला आहे. सिएटल-आधारित ई-कॉमर्स जायंटने प्रथमच तीन दिवसांची विक्री कार्यक्रम बनविण्यासाठी प्राइम डे वाढविला आहे....

माऊली समुह व फलटण येथील समर्थ प्रतीष्ठान यांच्या वतीने १,००० हजार वडापावचे वाटप

0
फलटण दि.१३| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवार दि १३ जुलै रोजी शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे मुक्कामास विसावणार असून या निमित्ताने...

Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025: रु. भारतात 10,000

0
प्राइम सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 सुरू झाले आहे. १२ जुलै रोजी मध्यरात्री राहिलेल्या या विक्रीत लोकांना १ July जुलैपर्यंत...

Amazon मेझॉन प्राइम डे सेल: सॅमसंग, अ‍ॅमेझफिट, वनप्लस, आवाज आणि अधिक स्मार्टवॉचवर शीर्ष 10...

0
Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 आता दुसर्‍या दिवशी पोहोचला आहे. सिएटल-आधारित ई-कॉमर्स जायंटने प्रथमच तीन दिवसांची विक्री कार्यक्रम बनविण्यासाठी प्राइम डे वाढविला आहे....

माऊली समुह व फलटण येथील समर्थ प्रतीष्ठान यांच्या वतीने १,००० हजार वडापावचे वाटप

0
फलटण दि.१३| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवार दि १३ जुलै रोजी शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे मुक्कामास विसावणार असून या निमित्ताने...

Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025: रु. भारतात 10,000

0
प्राइम सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 सुरू झाले आहे. १२ जुलै रोजी मध्यरात्री राहिलेल्या या विक्रीत लोकांना १ July जुलैपर्यंत...
error: Content is protected !!